टाटा मोटर्ससाठी 2019 हे वर्ष काही खास नव्हते. मात्र नवीन वर्षात कंपनीच्या अनेक नवीन कार्स लाँच होणार आहेत. कंपनीचे 12 मॉडेल्स यावर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.

ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि सनरुफसह नवीन टाटा हॅरिअर –

ही कंपनीची एक प्रमुख कार आहे. आता कंपनी या कारला ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि सनरुफसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारला भारतात चांगली मागणी होती. नवीन हॅरिअर भारतात कधी लाँच होणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

हे मॉडेल्स होणार लाँच –

टाटा अल्ट्रॉज आणि टाटा ग्रॅव्हिटास व्यतरिक्त कंपनी टाटा नेक्सॉनचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील कंपनी आहे. याशिवाय कंपनी टियागो आणि टीगोरचे बीएस6 व्हेरिएंट देखील लाँच करणार आहे.

टाटा ग्रॅव्हिटास –

ही कंपनीची नवीन 7 सीटर एसयूव्ही आहे, जी ऑटो एक्सपोमध्ये लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये 6- स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. कंपनी लवकरच हॅरिअरमध्ये देखील 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देणार आहे.

टाटा हॅरिअर –

टाटाने ही कार जानेवारीमध्ये भारताता लाँच केली होती. ही कार OMEGARC प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. जे टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हरने मिळून तयार केले आहे. टाटा मोटर्सने या एसयूव्हीमध्ये XE, XM, XT आणि XZ हे चार व्हेरिएंट दिले आहेत. यामध्ये 2.0 लिटर क्रायोटेक डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 3750 rpm वर 140 PS पॉवर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 4-सिलेंडर मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात अद्याप ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आलेले नाही.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: