दुचाकी कंपनी टीव्हीएसने भारतात आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूबला (TVS iQube) लाँच केले आहे. कंपनी प्रत्येक महिन्याला या स्कूटरचे 100 यूनिट तयार करणार आहे. पहिल्या काही दिवसात स्कूटरचे 100 यूनिट विकले जाण्याची कंपनीला आशा आहे.

 

ग्राहक कंपनीची वेबसाईट व निवड डिलरशीपकडे 5,000 रुपयांमध्ये टीव्हीएस आयक्यूब स्कूटर बुक करू शकतात. स्कूटरची विक्री सर्वात प्रथम बंगळुरूमध्ये केली जाईल व त्यानंतर इतर शहरात विक्री सुरू होईल. या स्कूटरवर कंपनी 2018 पासून काम करत आहे. कंपनीने 2 वर्षांपुर्वी ऑटो एक्स्पोमध्ये या स्कूटरचा प्रोटोटाइप सादर केला होता.

 

या स्कूटरमध्ये कंपनीने 4.4kW इलेक्ट्रिक मोटार दिली आहे. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 78 किमी असून, स्कूटर केवळ 4.2 सेंकदात ताशी 0 ते 40 किमीचा वेग पकडते. कंपनीनुसार सिंगल चार्जमध्ये स्कूटर 75 किमीचे अंतर पार करेल. टिव्हीएस आयक्यूबमध्ये इकोनॉमी आणि पॉवर मोड असे दोन रायडिंग मोड्स मिळतात. स्कूटर फुल चार्ज होण्यास 5 तास लागतात. कंपनीने या स्कूटरची किंमत 1.15 लाख रुपये ठेवली आहे.

 

टिव्हीएस आयक्यूब स्कूटर बजाजच्या चेतक आणि बेनलिंग ऑरा या इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देईल.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: