लॅम्बोर्गिनीने आपली शानदार सुपरकार हुराकॅन इव्हो आरडब्ल्यूडी (रिअर व्हिल ड्राईव्ह) भारतात लाँच केली आहे. भारतात या सुपरकारची किंमत 3.22 कोटी रुपये आहे. कंपनी ही कार देशात आधीच असलेले हुराकॅन ऑल व्हिल ड्राईव्ह आणि हुराकॅन इव्हो स्पायडर मॉडेलसोबत विकणार आहे. या दोन्ही कारची क्रमशः किंमत 3.73 कोटी आणि 4.1 कोटी रुपये आहे.

 

नवीन लॅम्बोर्गिनी हुराकॅन इव्हो आरडब्ल्यूडीमध्ये कंपनीने 5.2 लीटर व्ही10 पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 610पीएस पॉवर आणि 560 टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 7 स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्स सोबत येते. कंपनीचा दावा आहे की ही सुपरकार केवळ 3.3 सेंकदामध्ये ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. कारचा टॉप स्पीड ताशी 325 किमी आहे.

 

 

डिझाईनबद्दल सांगायचे तर यामध्ये कंपनीने नवीन फ्रंट स्प्लिटर आणि एअर इन्टेक दिले आहे. यात रिअर डिफ्यूजर देखील मिळेल. कारमध्ये अॅपल कारप्ले सपोर्टसोबत 8.4 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, फूल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 19 इंच एलॉय व्हिलज आहेत.

 

हलक्या रिअर व्हिल ड्राइव्ह लेआउटमुळे नवीन कारचे वजन इव्हो ऑल व्हिल डाइव्ह मॉडेलच्या तुलनेत 33 किलोंनी कमी आहे. कारमध्ये लॅम्बोर्गिनीचे परफॉर्मेंस ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमचे एक विशेष पद्धतीचे व्हर्जन आहे. ज्यात स्ट्राडा, स्पोर्ट आणि कोर्सा ड्राइव्ह मोड आहेत. ही कार ग्राहक आपल्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकतात.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: