जगात सर्वात कमी वेळात कॅन्व्हर्ट होणारे रुफ घेऊन अॅस्टन मार्टीनची व्हेन्टेज् रोडस्टर सादर झाली असून या सुपरकारची किंमत १ लाख ६१ हजार डॉलर्स म्हणजे साधारण २ कोटी रुपये असेल असे समजते. कंपनीच्या पोर्टफोलियो मध्ये ही कार वेन्टेज् कुपेसह सामील करण्यात अली असून या कार मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. ती अधिक शक्तिशाली बनली आहेच पण हटके स्टाईल मुळे ती अधिक नजरेत भरते आहे.

 

या कारला ४ लिटरचे ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन दिले गेले असून ती ० ते १०० किमीचा वेग ३.५ सेकंदात गाठू शकते. तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी ३०६ किमी. कुपेच्या तुलनेत या कारचे वजन ६० किलोने अधिक आहे. तिच्या शिअर पॅनल, चासीस कंपोनंट मध्ये बदल केला गेला आहे. परिणामी ती अधिक शक्तिशाली आणि ड्राईव्ह करण्यास अगदी सुलभ आहे. स्पोर्ट्स, स्पोर्ट ट्रॅक चेसीस मोड दिले गेले असून चालक गरजेनुसार निवड करू शकतो.

 

या कारला कॉम्पॅक्ट झेड फिल्ड तंत्राने बनविलेले कापडी हूड दिले गेले असून ते केवळ ६.७ सेकंदात बंद करता येते आणि ६.८ सेकंदात पुन्हा खोलता येते. विशेष म्हणजे कार ५० किमीच्या वेगाने जात असली तरी हूड बंद करणे किंवा उघडणे सहज करता येते असा कंपनीचा दावा आहे.                                  

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: