जापानी कंपनी निसान सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली नवीन कार लवकरच लाँच करणार आहे. निसानने आपल्या नवीन एसयूव्हीचा एक टिझर लाँच केला आहे. निसानची ही नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती ब्रेझा, ह्युंडई वेन्यू, टाटा नेक्सॉनला टक्कर देईल.

 

निसानच्या या नवीन एसयूव्हीचे कोड नाव निसान ईएम 2 असे आहे. अद्याप याचे अधिकृत नाव समोर आलेले नाही. ही कार मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्डवर आधारित आहे. त्यामुळे ही एसयूव्ही दुसऱ्या देशात देखील एक्सपोर्ट केली जाण्याची शक्यता आहे.

 

नवीन टीझरमध्ये एसयूव्हीमध्ये दिसणारे एलईडी गाइड लाइट्ससोबत रॅपअराउंड टेललॅम्प दिसत आहेत. याच्या आत हनीकॉम्ब पॅटर्न देण्यात आला आहे.

 

पहिल्या टीझरमध्ये या एसयूव्हीचा लूक समोर आला होता. यामध्ये याचे डिझाईन आणि स्टायलिंग निसान किक्सपासून घेण्यात आल्याचे दिसून येते. किक्सप्रमाणेच यात सिल्वर रुफ रेल्ससोबत फ्लोटिंग स्टाइल रूफ, रुंद सी-पिलर, मागील बाजूला ट्रायंग्युलर क्वार्टर ग्लास आणि रिअर स्पॉयलर दिसत आहे. नवीन एसयूव्हीमध्ये विंडो लाईनसोबत क्रोम स्ट्रिप, बोल्ड लूक देणारे आर्च आणि साइड बॉडी क्लॅडिंग असेल.

 

या एसयूव्हीमध्ये 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हेच इंजिन रेनॉ ट्रायबरमध्ये देखील मिळण्याची शक्यता आहे. ही एसयूव्ही सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: