फ्रेंच कंपनी न्यूरॉनने आपली लाकूड आणि लेदरपासून बनलेली इलेक्ट्रिक मोटारसाईकल ईव्ही1 चे प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. कंपनीने या ईलेक्ट्रिक बाईकला 2019 मध्ये सादर केले होते.  या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे यात ऑर्गेनिक कर्व्ड वुडन बॉडीवर्क करण्यात आले आहे.

 

यासोबत यात सिलेंड्रिकल बॅटरी पॅक मिळतो, जो हँडलबार आणि सीट्सच्या मध्ये लावण्यात आलेला आहे. बॅटरीच्या आजुबाजूला वेगवेगळ्या रंगाच्या एलईडी लाइट्स आहेत, ज्याला सुंदर लूक देतात. कंपनीनुसार, या वर्षी बाईकच्या केवळ 20 यूनिट्स बनविल्या जातील. या बाईकला 1.56 लाख रुपयांमध्ये बुक करता येईल. बाईकची किंमत 47 लाख रुपये असून, याची डिलिव्हरी 2021 पासून सुरू होईल.

न्यूरॉन ईव्ही1 बाईकचा टॉप स्पीड ताशी 220 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जिंगमध्ये ही बाईक 300 किमी अंतर पार करेल. यात लेव्हल 3डीसी फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, जे या बॅटरीला 20 मिनिटात फुल चार्ज करते.यात 75 kw ची मोटर देण्यात आली आहे. जी 102 हॉर्स पॉवर देते. ही बाईक अवघ्या 3 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

 

कंपनी यासाठी डासोल्ट सिस्टम आणि फ्रान्सच्या मायक्रो फायनेंस ग्रुप अडवॉनस सोबत भागीदारी केली आहे. कंपनी याच्या इंटेलीजेंट राइड मोड्सवर काम करत आहे. याद्वारे चालक बाईकला जेस्टिनेशन संबंधित माहिती देऊ शकेल. जेणेकरून बाईख पॉवरचा योग्यप्रकारे वापर करू शकेल.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: