ह्युंडाईने भारतीय बाजारात ग्रँड आय10 निओसचे पॉवरफुल व्हर्जन लाँच केले आहे. या कारमध्ये बीएस -6 मानक 1.0 लीटर टर्बो जीडीआय इंजिन देण्यात आलेले आहे. टर्बो इंजिन असणारी ग्रँड आय10 निओस स्पोर्ट्झ आणि स्पोर्ट्झ ड्युअल टोन या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, या व्हेरिएंटची क्रमशः किंमत 7.68 लाख आणि 7.73 लाख रुपये आहे.

 

या कारमध्ये देण्यात आलेले टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 998सीसी आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 99 bhp पॉवर आणि 1,500 ते 4000 rpm वर 172 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आले आहे.

कारच्या लुकमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. याच्या फ्रंट ग्रिलवर केवळ ‘Turbo’ बँजिंग देण्यात आलेले आहे. या कारला कंपनीने ड्युअल टोन कलर्समध्ये सादर केले आहे. यात ब्लँक रूफसोबत फेअर रेड आणि ब्लँक रुफसोबत पोलार व्हाईट रंग मिळेल. सोबतच कार सिंगल टोन कलर्स अॅक्वा टील आणि पोलार व्हाईटमध्ये देखील उपलब्ध आहे.

 

फीचर्सबद्दल सांगायचे तर याच्या टर्बो व्हर्जनमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, 15-इंच डायमंड कट एलॉय व्हिल्ज, कलर इन्सर्ट्ससोबत ब्लॅक इंटेरिअर, लेदर फिनिश स्टेरिंग व्हिल, वायरलेस चार्जर आणि फ्रंट यूएसबी चार्जर हे फीचर्स मिळतील.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: