कस्टम मोटरबाईक्स बनविणाऱ्या गेम ओव्हर कंपनीने जगातील पहिली टॅट्यूड मोटरसायकल बनविली असून हर्ले डेव्हिडसन हेरिटेज मोटरबाईकवर ती आधारलेली आहे. या बाईकचा जवळजवळ प्रत्येक भाग लेदर पासून बनविला गेला आहे आणि या लेदरवर हाताने टॅटू काढले गेले आहेत. या बाईकची किंमत १० लाख डॉलर्स म्हणजे ७.४ कोटी रुपये आहे.

 

या बाईकची स्टाईल युनिक असून जगभरात तिला अनेक अॅवॉर्ड मिळाली आहेत. ही बाईक तयार करण्यासाठी ३ हजार तास लागले असून टॅटू काढण्यासाठी आणखी २५०० तास लागले असल्याचे सांगितले जात आहे. बनताच ही बाईक लोकप्रिय झाली आहे. या बाईकचे अनेक भाग विशेष प्रकारे मॉडीफाय केले गेले आहेत.

 

या बाईकच्या इग्निशन प्लगला रिअर टॅटू गन प्रमाणे आकार दिला गेला असून एग्झोस्ट पाईप, सायलेन्सरला टॅटू मशीनचा आकार दिला गेला आहे. फ्रंट कॅलिपर्स, हँडकप्स, क्लच व ब्रेक लिव्हर बटरफ्लाय नाईफ प्रमाणे आहे तर गिअरशिफ्ट लिव्हर क्रोबार प्रमाणे आहे. किक स्टार्ट बॉम्ब डीटोनेटर लिव्हर प्रमाणे आहे.                                                                                                            

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: