मुंबई – आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयकडून मागील 5 महिन्यांपासून सातत्याने रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली होती. पण आजच्या डिसेंबर महिन्यातील जाहीर केलेल्या रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्यात आल्यामुळे हा रेपो रेट आता 5.15% वर कायम राहणार आहे. दरम्यान या महिन्यातही व्याजदरात कपात होईल अशी अपेक्षा होती, पण तसे काही झालेले नाही. सोबतच रिव्हर्स रेपो रेट देखील 4.90% वर कायम असल्यामुळे कर्जदारांचे व्याजदर कायम राहणार आहेत.

 

सुमारे 5% ने आर्थिक वर्ष 2019-20 मधील दुसर्‍या तिमाहीत खाली आलेला विकास दर, वाढलेला महागाई दर हे पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये दर कपात होण्याचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, पण ही अपेक्षा फोल ठरली आहे.

 

तर जीडीपी देखील 6.1% वरून 5% वर आला आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीसाठी महागाई दर 5.1% राहील, असाअंदाज बँकेने वर्तवला आहे. दरम्यान ओला दुष्काळ असल्याने सध्या भाजीपाल्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर चढे आहेत. ते पुढील काही दिवस कायम राहण्याचे चित्र आहे.

 

आता शेअर बाजारावरही आरबीआयने जाहीर केलेल्या आजच्या पतधोरणाचा परिणाम पाहता येणार आहे. रेपो रेटमध्ये कपात न झाल्याने सेनेक्स, निफ्टी कमी झाल्याची पहायला मिळाली आहे. शेअर बाजार आज सकाळी उघताच सेन्सेक्स 69 अंकांच्या तेजीसह 40 हजार 920 अंकांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16 अंकांनी वधारून 12 हजार अंकांवर आला होता

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: