प्रसिद्ध कार कंपनी रोल्स रॉयसने जगातील सर्वात वेगवान बॅटरीवर चालणाऱ्या विमानाचे इंग्लंड येथील ग्लूस्टरशायर विमानतळावर प्रदर्शन केले. हे विमान ताशी 480 किमी वेगाने उड्डाण घेऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यंत हे विमान आकाशात उड्डाण घेईल.

 

रोल्स रॉयसचे एसीसीईएल प्रोजेक्ट संचालक माथेउ पार यांनी सांगितले की, हे सिंगल सीटर विमान अत्याधुनिक विद्युत प्रणाली आणि उड्डाणसाठी आतापर्यंतची सर्वात ताकदवर बॅटरीद्वारे संचालित करण्यात येईल. विमानाचे पंख ब्रिटेनमध्ये तयार करण्यात आले आहेत. हे हाय पॉवरच्या 3 मोटर्सद्वारा संचालित आहे.

 

रोल्स रॉयसच्या टीमचे म्हणणे आहे की, सर्वात मोठे आव्हान हे बॅटरीचे होते. यासाठी अशा बॅटरीची गरज होती जे विमानाची गती कायम ठेवेल व उड्डाणावेळी गरम होणार नाही. हे विमान सिंगल चार्जमध्ये लंडन ते पॅरिस हे 470 किमीचे अंतर पारू शकते, यावरूनच बॅटरीची क्षमता लक्षात येते.

 

बॅटरीला थंड करण्यासाठी एडवांस्ड कूलिंग सिस्टम वापरण्यात आले आहे. याचे प्रोपेलर 3 हायपॉवर डेंसिटी असणाऱ्या मोटारद्वारे चालतात. जे रेग्युलर ब्लेड्सच्या तुलनेत कमी आरपीएमवर फिरते. लांबचे उड्डाण घेताना देखील संतुलने कायम ठेवते. याची मोटार 500 पेक्षा अधिक हॉर्स पॉवर जनरेट करेल.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: