अ‍ॅपलला जुने आयफोन जाणूनबुझून स्लो करणे महागात पडले आहे. कंपनीला फ्रान्सच्या एका तपास एजेंसीने तब्बल 27 मिलियन डॉलर (जवळपास 200 कोटी रुपये) दंड ठोठवला आहे.

एजेंसीचे म्हणणे आहे की, अ‍ॅपलने आयफोन्सला स्लो करण्याआधी युजर्सला याबाबत माहिती दिली नाही. 2017 मध्ये आयफोनने स्पष्ट केले होते की, आयफोन्सची लाईफ वाढावी यासाठी फोन्सला स्लो केले होते. यामध्ये आयफोन 6, आयफोन 7 आणि आयफोन एसई मॉडेलचा समावेश होता.

रिपोर्टनुसार, कंपनी हा दंड भरण्यास तयार असून, युजर्सला या प्रकरणाची माहिती देण्यासाठी कंपनीला आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक महिने याची प्रेस रिलीज दाखवावी लागेल. 2017 मध्ये काही युजर्सनी आयफोन स्लो झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 2018 मध्ये एजेंसीने याचा तपास सुरु केला.

तपासानंतर अ‍ॅपलने मान्य केले की, आयओएस 10.2.1 आणि आयओएस 11.2 सोबत असे फीचर आणण्यात आले होते. जेणेकरून जुने आयफोन्स अचानक बंद पडू नये. कारण त्यांची बॅटरी देखील खूप जुनी झाली होती. कंपनीने आपल्या युजर्सला याबाबतची कोणतीही माहिती दिली नव्हती.                                                                                                

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: