अमेरिकेची टेक कंपनी अ‍ॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोर सुरू करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अ‍ॅपलचे प्रोडक्ट्स ऑथराईज्ड डिलर्स अथवा ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे खरेदी करता येत होते.

 

अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक म्हणाले की, भारतात पुढील वर्षी कंपनीचे पहिले स्टोर सुरू होईल. याशिवाय कंपनी याच वर्षी ऑनलाईन स्टोर सुरू करणार असल्याची माहिती देखील कूक यांनी दिली. कॅलिफोर्निया येथे सुरू असलेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान त्यांनी भारतातील प्लॅन्सबाबत माहिती दिली.

 

रिपोर्टनुसार, कंपनीला स्टोरसाठी भारत सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. मात्र पहिले वहिले अ‍ॅपल स्टोर कोणत्या शहरात सुरू होणार आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मुंबईमध्ये कंपनी आपले पहिले स्टोर सुरू करण्याची शक्यता आहे.

 

भारतात अ‍ॅपल सॅमसंग आणि इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत खूपच मागे आहे. मात्र असे असले तरी कंपनीने आयफोनच्या काही मॉडेल्सचे भाग भारतात असेंबल्स करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, कंपनी पुढील महिन्यात आपला सर्वात स्वस्त फोन आयफोन एसई2 अथवा आयफोन 9 लाँच करू शकते. हा फोन भारतात लोकप्रिय ठरू शकतो.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: