होंडाच्या पाचव्या जनरेशन होंडा सिटीवरील थायलंड येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये पडदा हटवण्यात आला आहे. सध्या बाजारात असलेल्याम मॉडेलच्या तुलनेत नवीन कार अधिक मोठी, चांगली आण जास्त मायलेज देणारी आहे. 2020 मध्ये ही कार भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

नवीन होंडा सिटीचा समोरील लूक एकदम नवीन आहे. यामध्ये मोठी आणि रूंद क्रोम ग्रिल, डेटाइम रनिंग लाइट्ससोबतच रिवाइज्ड रॅपराउंड हेडलॅम्प्स आणि नवीन डिझाईनचे फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. कारच्या बोनेटचे डिझाईन देखील बदलण्यात आले आहे. कारच्या मागील बाजूस सी-शेप एलईडी टेमलॅम्प्स आणि वर्टिकल पोजिशनमध्ये लागलेले रिप्लेक्टर्ससोबत नवीन डिझाईनचे बंपर आहेत.

सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत नवीन होडा सिटी 100 एमएम लांब आणि 53 एमएम रूंद आहे. मात्र उंची 28 एमएम आणि व्हिलबेस 11 एमएमने कमी आहे. यामध्ये मोठा कॅबिन स्पेस मिळेल.

नवीन होंडा सिटीच्या इंटेरियर नवीन जनरेशन होंडा जॅज प्रमाणे आहेत. यात नवीन डॅशबोर्ड आणि माउंटेड ऑडिओ, ब्लूटूथ व क्रूज कंट्रोल मिळेल. यामध्ये अँड्राईड ऑटो आणि अपल कारप्ले सोबत 8 इंच नवीन टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्ट देण्यात आले आहे.

नेक्सट जनरेशन होंडा सिटी थायलंड मॉडेलमध्ये दोन इंजिन पर्याय मिळेल. यात 1.0 लीटर, 3 सिलेंडर VTEC टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 120bhp ची पॉवर आणि 173Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 23.8 किमी प्रती लीटर मायलेज देते. दुसरे इंजिन हायब्रिट पेट्रोल इंजिन आहे. 2020 मध्ये ही कार भारतीय बाजारात दाखल होईल.

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: