नवी दिल्ली : आयसीसीने 2019 च्या विश्वचषकाच्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या निकालावर झालेल्या टीकेनंतर अखेर सुपर ओव्हरच्या नियमांत बदल केला आहे. आयसीसीने यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.

आयसीसीने इंग्लंडला सुपरवर ओव्हरच्या नियमानुसार अधिक चौकारांच्या जोरावर विजयी घोषित केल्यानंतर आयसीसीच्या या नियमांवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीका केली होती.

आयसीसीने नियमात बदल करत सेमी फायनल किंवा फायनलमध्ये सुपर ओव्हरही अनिर्णित झाली तर निकाल लागेपर्यंत पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील असा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला.                                                                

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: