नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका भारतीय संघाने 2-0ने आपल्या खिशात घातली. फलंदाज आणि गोलंदाजांनी पुण्यात झालेल्या सामन्यात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत विजय मिळवला. विराट कोहलीने यात पहिल्या डावात 257 धावांची विक्रमी खेळी केली.

त्यानंतर विराट कोहलीचे सर्वच स्तरांवर कौतुक होत आहे. कसोटीमध्ये विराटने सातवे कसोटी शतक केले. आता विराटचे कौतुक पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने केले आहे.

विराटने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात विक्रमी कामगिरी केल्यानंतर शोएबने विराट हा जगातील नंबर एकचा कर्णधार असल्याचे मत शोएब अख्तरने आपल्या यू-ट्युब चॅनलवर व्यक्त केले. शोएबने याशिवाय भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांचेही कौतुक केले आहे.

आपल्या व्हिडीओमध्ये शोएबने, जगभरातील कर्णधार मी पाहिले आहे. सगळेच्या सगळे मठ्ठ आहेत. फक्त विराट हा एकमेव सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे असे सांगत. त्याने यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसचेही कौतुक केले. पण सरफराज हा डोके फिरलेला कर्णधार असल्याचे म्हणत त्याला अख्तरनं ट्रोल केले.

शोएबने सरफराज बेअक्कल असल्याचे मत वर्ल्ड कप दरम्यान व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा सरफराजवर शोएबने टीका केली आहे. सरफराजला बिनडोक म्हणत, डोके फिरलेला कर्णधार अशी टीका शोएबने केली आहे. त्याचबरोबर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर काय झाले माहित नाही, असेही शोएब म्हणाला.

आपल्या व्हिडीओमध्ये शोएबने, विराटने वर्ल्ड कपनंतर आपल्या कर्णधारीमध्ये सुधारणा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये झालेल्या चुकांमधून तो खुप शिकत आहे. त्याला माहित आहे की, कोणत्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे आणि कोणत्या खेळाडूंना नाही. त्याने बॅटिंग ऑर्डरवर काम केले असल्याचे मत व्यक्त केले.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: