मुंबई – २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून ऑक्टोबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते. यानुसार मंगळवारी राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च दरम्यान होणार आहे.                                                                                  


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: