जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. पाणी आपल्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी खूफ आवश्यक असते. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी खालील गोष्टींकडे लक्ष द्या.

– सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी आपल्या क्षमतेनुसार 1 ते 2 ग्लास पाणी प्या. शरीरासाठी हे खूप फायदेशीर आहे.– लक्षात ठेवा आपले अर्धे पोट जेवणाने, एक चतुर्थांश भाग पाण्याने आणि उर्वरित 25 टक्केभाग हवेने भरलेला पाहिजे.– जवळजवळ 70 टक्के आजार दुषित पाण्यामुळे होतात.– पाण्याचे योग्यप्रमाणात सेवन केल्यास जीवनात त्याचा मोठा फायदा होईल.– जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर 1 ते 2 घोटच पाणी प्यावे. जास्त पाणी पिले तर जेवण पचण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

कशी घ्यावी ज्यूस थेरपी? – ज्यूस थेरपी सुरू करण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. याअंतर्गत दिवसभरात पाच ते सहावेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसचे सेवन केले जाते. दिवसाच्या सुरुवातीला सर्वप्रथम दोन ग्लास लिंबूपाणी प्यावे. त्यानंतर एखाद्या फळाचा रस प्यावा. संर्त्याचा रस, टोमॅटो, गाजर आणि बीट यांचा रस एकत्र करून सेवन करावा. दुपारी कलिंगडाचा रस पिणे जास्त फायदेशीर ठरू शकते. सायंकाळी संत्रे, सफरचंद आणि द्राक्षाचा रस एकत्र करून घ्यावा. या ज्यूस डायटमध्ये फेरबदल करत राहावेत. उदाहरणार्थ ज्यूसमध्ये पालक, काकडीसुद्धा मिक्स करू शकता.

वेगवेगळ्या ज्यूसचे फायदे– बीट या फळाचा रस रक्त शुद्ध करतो. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये पोट साफ करतात.– गाजराच्या रसात असलेले ’अ‘ जीवनसत्त्व यकृतासाठी खूफ फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्व वजन कमी करणे, डोळे निरोगी ठेवणे आणि कॅन्सरपासून बचाव करण्यातही सहाय्यभूत ठरतो.– पालकाचा रस दिवसभरातून दोनवेळा पिल्यास रक्तशर्करा नियंत्रित राहते.

– टोमॅटोचा ज्यूस हृदयासंबंधित आजार बरे करण्यास मदत करतो.– काकडीचा रस सांधेदुखीपासून बचाव करतो. यामध्ये पोटॅशियमचे चांगले प्रमाण असते. किडनीला ते फायदेशीर आहे. याशिवाय उच्च रक्तदाबही नियंत्रित राहतो आणि त्वचेशी संबंधित आजारही बरे होतात.– चेरीच्या रसात ’क‘ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमचे चांगले प्रमाण असते. यामुळे अॅनिमियापासूनही (रक्तक्षय) बचाव होतो.

– लिंबू-पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडतात आणि डायरियाही (अतिसार) होत नाही.– पपईचा रस पचनक्रियेशी संबंधित आजार दूर करतो.– द्राक्षाचा रस रक्तदाब कमी करतो. रक्तशर्करा पातळीही नियंत्रित ठेवतो. याशिवाय दिवसभर ऊर्जा मिळते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: