मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या 14 रुग्णांची काल दिवसभरात नोंद झाली.

 

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी ‘ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात आले असून ३० मार्चपर्यंत मॉल्स बंद राहतील, असे सांगितले. उद्धव ठाकरे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मॉल्स बंद करण्याचा निर्णय गर्दी टाळण्यासाठी घेतला आहे.

 

ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंदकरता येणार नाहीत. पण अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाग्रस्तांचा खर्च राज्य सरकारच करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ अंमलात आणावे असेही आदेश दिले. त्याचबरोबर आदेशानंतर चित्रपटगृह किंवा मॉल्स सुरु ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले.                                                                                       

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: