मुलांचे मन चंचल असते. ते जास्त वेळ कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर कस काढायला पाहिजेल. मुलांची एकाग्रता आणि स्मरण शक्ती कशी वाढवली पाहिजे याची चिंता आणि काळजी प्रत्येक पालकाला असते.

मुलांच्या विकासासाठी ३ ते ६ हे वय महत्त्वाचे असते. यामुळे या वयापासूनच मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सुरुवात केली पाहिजेल. जसे आपल्या शरीराला आहार, विहार आणि निद्रा अशा गोष्टींची गरज असते. तसेच आपल्या मेंदूला सुद्धा चांगला आहार, व्यायाम आणि झोप या गोष्टींची गरज असते. आणि तरच मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूचा विकास होतो आणि स्मरणशक्ती टिकून राहते.

मुलांना पौष्टिक आहार देणे फार महत्वाचे आहे. मुलांना आहारात सतत रंगीत फळं आणि रंगीत भाज्या दिल्या पाहिजेल. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. मुलांच्या आहारात प्रोटीन्सचा समावेश करणे महत्वाचे आहे.

प्रोटीन्ससाठी आहारात अंडी, मासे, चिकन या पदार्थांचा समावेश करावा. ड्रायफ्रूट मुलांच्या विकासासाठी खूप महत्वाचे असते. यामुळे आपण रोज मुलांना बदाम, आक्रोड, अंजीर अशा पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात करावा.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: