कॅब एग्रीगेटर प्लॅटफॉर्म उबरने ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन तीन नवीन फीचर लाँच केले आहेत. यामध्ये पिन व्हेरिफिकेशन, राइट चेक आणि ऑडिओ रेकॉर्डिंग या सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे. उबरची प्रतिस्पर्धी कंपनी ओला यातील काही फीचर आधीपासूनच देत आहे.

 

पिन व्हेरिफिकेशन –

पिन व्हेरिफिकेशन फीचर अंतर्गत उबर राइड बुक करणाऱ्या प्रवाशाला चार आकडी पिन मिळेल. तो पिन राइड सुरू झाल्यावर ड्रायव्हरला सांगावा लागेल. हा पिन ड्रायव्हर अ‍ॅपमध्ये मॅन्युअली टाकू शकतात, तसेच अल्ट्रासाउंड वेव्सद्वारे कार प्रवाशाजवळ पोहचल्यावर पिन ऑटोमॅटिक ड्रायव्हरला जाईल.

उबर असिस्टेंस –

राइड चेक फीचरद्वारे राइड दरम्यान कोणत्या अडथळ्याला थांबवता येईल. जसे की, राइड दरम्यान कॅब रस्त्यात अधिक वेळ थांबत असल्यास तुम्ही कस्टमर केअरला याची सूचना देऊ शकता. हे फीचर खास महिलांसाठी आहे. जर उबरला याविषयी काही सुचना मिळाल्यास कंपनी त्वरित ड्रायव्हर आणि राइडरला पूश नॉटिफिकेशन पाठवेल.

ऑडिओ रेकॉर्डिंग –

या फीचरमध्ये ड्रायव्हर आणि राइडर दोघेही एकमेंकाचा संवाद ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात. हा ऑडिओ इनक्रिप्टेड असेल जो केवळ डिलीट अथवा उबरसोबत शेअर केला जाईल. शेअर केल्यानंतर उबर एजेंट प्रकरणाविषयी ऐकून घेईल. ड्रायव्हर अनेकदा प्रवाशांसोबत गैरवर्तन करतात, अशावेळी हे फीचर फायदेशीर ठरेल.

उबरनुसार पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हे फीचर सध्या दिल्ली, कोलकाता आणि अन्य शहरात सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन आठवड्यात संपुर्ण देशात हे फीचर्स सुरू होईल.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: