‘ पानिपत’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणी सध्या यु ट्यूबवर चांगलीचं लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या मऱ्हाटेशाहीच्या कार्य कर्तुत्वावर आणि शौर्यावर काढलेल्या चित्रपटाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. तर हा चित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहनही त्यांनी एका पोस्ट द्वारे केले आहे.

 

पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाटेशाही कुठे आणि का कमी पडली? त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझए मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

 

दरम्यान आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या चित्रपटात अर्जुन कपूर हा सदाशिव भाऊच्या मुख्यभूमिकेत आहे. तर संजय दत्त हा अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत असणार आहे. तसेच सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे.                                                                                              

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: