आपल्यापैकी सर्वचजण सध्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन आतापासून करत असतील, यात काही शंका नाही. नवीन वर्षाच्या स्वागता निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. बॉलिवूड कलाकार देखील या पार्ट्यांमध्ये सहभागी होतात.

 

अनेकांमध्ये त्यांची तासाभराची हजेरी आणखी उत्साह निर्माण करुन जाते. पण एका तासाच्या हजेरीसाठी हेच कलाकार कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एक तास हजेरी लावण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला किती रक्कम घेणार हे समोर आले आहे.

 

उर्वशी रौतेला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये हजेरी लावणार आहे. या पार्टीमध्ये १ तास ती डान्स करणार असून ती त्यासाठी तब्बल ३ कोटी रुपये मानधान घेणार असल्याचे वृत्त आहे. ‘डॅडी मम्मी’, ‘हसीनों का दीवाना’ आणि ‘पागलपंती’ या गाण्यावर ती डान्स करणार असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशात आतापर्यंत कोणत्याच कलाकाराने एक तासाच्या डान्ससाठी एवढे मानधन घेतले नसेल.

 

उर्वशीचा ‘पागलपंती’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. पण बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई या चित्रपटाने केली नाही. उर्वशी आता लवकरच एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. सुशी गणेशन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: