प्रियदर्शन जाधवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आणि अभिनेता जितेंद्र जोशी आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या आगामी ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दमदार स्टारकास्ट आणि धमाल मनोरंजन असलेल्या या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत, त्यानंतर घडणारे प्रसंग अतिशय खुमासदार पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. हा चित्रपट विनोद आणि मनोरंजनाने पूर्ण असल्याचा अंदाज या ट्रेलरवरून लावता येतो. याशिवाय चित्रपटाचे संगीतही ताल धरायला लावणारे आहे.

 

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून जितेंद्र जोशीनेही ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. जगात चांगुलपणा शिल्लक आहे… आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला.. आवडून घ्या आणि सगळ्यांबरोबर वाटा, असे कॅप्शन या फोटोवर त्याने दिले आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे.                                                                                       

https://www.youtube.com/watch?v=qDq3Lk4NHDo&feature=emb_title

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: