मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.


तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पंतप्रधान सहाय्यता निधीत 21 लाख रुपयांची मदत केली आहे. तिनेच ट्वीट करून ही माहिती तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या परिने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करेन… आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला तोंड देऊया…


विविध क्षेत्रातील मंडळी आर्थिक मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. ‘माझ्याकडून ही छोटीशी मदत आहे. समुद्रात मी फक्त पाण्याचा एक थेंब टाकला आहे. या कठीण प्रसंगी मदत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. घरामध्येच सुरक्षित राहा,’ असे आवाहन त्याने जनतेला केले आहे.


दरम्यान, अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://mobile.twitter.com/narendramodi/status/1243861543185305603?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1244264731621220353&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fshilpa-shetty-contribute-pm-narendra-modis-cares-fund-news-update%2F

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: