तेलुगू सिनेसृष्टीत एकाहून एक ब्लॉकबस्टर फिल्म्स देणारे दिग्दर्शक SS राजमौली यांच्या ‘बाहुबली- द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली- द कन्क्लुजन’ या सिनेमांनी भारतीय सिनेमाविश्वात क्रांती केली. भव्य निर्मितीमूल्यं, अवाढव्य सेट्स, मॉब, कपडे, फाईट सीन्स, अ‍ॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स या सर्वच बाबतीत साधारण भारतीय सिनेमांच्या अनेकपट पुढे असलेल्या ‘बाहुबली’ने इतिहास घडवला. 

     प्रभास आणि राणा दुग्गबाटी यांची क्रेझ देशभरात निर्माण झाली. यानंतर SS राजामौली यांनी ‘RRR’ या सिनेमाची घोषणा केली.  तेलुगू सिनेसृष्टीत फार आभावानेच घडणारी एक गोष्ट या सिनेमात आहे, ती म्हणजे दोन प्रचंड क्रेझ असणारे सुपरस्टार्स यांच्यातील जुगलबंदी. Jr. NTR आणि राम चरण तेजा हे दोघे तेलुगूमधील प्रचंड फॅन फॉलोइंग असणारे सुपरस्टार्स या सिनेमात दिसणार आहेत. तसंच आलिया भट्ट, अजय देवगण यांसारखे बॉलिवूडमधील स्टार्स या सिनेमात असल्यामुळे या सिनेमाबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. हा सिनेमा बाहुबलीइतकाच भव्यदिव्य असणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय. तर त्याचं उत्तर ‘होय’ असंच असणार आहे. कारण RRR सिनेमाच्या एका सीनसाठी 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

काय आहे 45 कोटींचा सीन ?

या सीनचं चित्रीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचं शेड्युल बनवण्यात आलं.

या सीनमध्ये दोन्ही सुपरस्टार्स  एकमेकांसमोर असणार आहे.

या सीनमध्ये एकूण 2 हजार कलाकारांचा सहभाग आहे.

काही परदेशी कलाकारांचाही सहभाग असणार आहे.

हा भारतातला सर्वांत मोठा साहसी सीन असल्याचं सांगण्यात येतंय.

प्री व्हिज्युअलायझेशन आणि प्रशिक्षणानंतरच फायटर्सच्या मदतीने हा सीन शूट करण्यात आला.

या सिनेमाच्या shooting सुरुवात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाली.

जुलै 2020च्या शेवटपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

     SS राजामौली हे मेहमीच भव्यदिव्य आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनवणारे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘सिंहाद्री’, ‘साय’, ‘मर्यादा रमण’, ‘इग्गा'(मक्खी) , ‘मगाधीरा’, ‘छत्रपती’, ‘यमडोंगा’ यांसारखे एकाहून एक ब्लॉकबस्टर सिनेमे त्यांनी तेलुगूमध्ये बनवले आहेत. रामचरण तेजाला घेऊन बनवलेला ‘मगाधीरा’ आणि  ज्युनिअर NTR सोबत बनवलेले ‘सिंहद्री’, ‘यमडोंगा’ या सिनेमांमध्ये कलाकारांना ज्या पद्धतीने सादर केलं, त्यामुळे दोन्ही स्टार्सची दक्षिणेत प्रचंड क्रेझ निर्माण झाली. आता या दोन्ही स्टार्ससोबत पुन्हा एकदा SS राजामौली ‘RRR’ बनवत असल्यामुळे हा सिनेमा ‘बाहुबली’पेक्षाही भव्य असणार यात शंका नाही.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: