“हाऊसफुल 4′ गेल्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचे वेगवेगळ्या लूकमधील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. ते पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता चाहत्यांच्या आनंदात भर घालत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

“हाऊसफुल 4′ चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटात सर्व कलाकारांचा पुनर्जन्म झालेला असून. त्यांना 600 वर्षांपूर्वीचा काळ आठवत असल्याचे दाखवले आहे. तसेच चित्रपटात सगळ्याच कलाकारांचा डबल रोल असणार आहे.

ट्रेलरमधील अक्षय कुमारचा लूक पाहता सर्वांना “भुल भुलैय्या’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर ऑस्ट्रेलिया, दुबई आणि युके येथे एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपट प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला सज्ज असल्याचे दिसत आहे.

“हाऊसफुल’ या फ्रॅंचाइजीमधला “हाऊसफुल 4′ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर, 26 ऑक्‍टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.                                                                        


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: