आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड विषयी माहिती देताना मोठी चूक केली आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर हॉल ऑफ फेमच्या यादीत राहुल द्रविड डाव्या हाताचा फलंदाज असल्याचे म्हटले आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवर राहुल द्रविडच्या समोर डावखुरा फलंदाज असे लिहिले आहे.

यावरून सोशल मीडियावर आयसीसीची खिल्ली उडवली जात आहे. राहुल द्रविडला मागील वर्षी आयसीसीने हॉल ऑफ फेमने सन्मानित केले होते. या यादीत स्थान मिळवणारा राहुल द्रविड पाचवा भारतीय खेळाडू आहे.

द्रविडच्या स्नामानार्थ कॅप देखील देण्यात आली होती. सुनील गावस्कर यांच्या हस्ते मागील वर्षी त्याचा सन्मान करण्यात आला होता.

द्रविडबरोबरच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू क्लेयर टेलरला देखील आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले होते. द्रविडबद्दल केलेल्या या चुकीमुळे सोशल मीडियावर आयसीसीची खिल्ली उडवली जात आहे.                                                                                                                        


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: