बहुचर्चित कर्जत-जामखेड मधून शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी फडणवीस सरकारमधील मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे. रोहित पवार हे गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघात विकासकामे केली. त्यामुळेच त्यांचा विजय झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला आहे. गडाख हे शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून तर बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.

शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय मिळवला आहे. ह मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. त्यांनी तब्बल ७५ हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचा सामना कॉंग्रेसच्या सुरेश थोरात यांच्याशी झाला. यात त्यांनी विजय मिळवला आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या रावसाहेब नवले यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे त्यांना संगमनेर मध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. त्यांच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.                                                                                                                                                    


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: