मुंबई : महात्मा गांधी यांच्या हत्येचे आश्रयदाते सावरकर हेच होते, असे सांगून महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपाच्या प्रस्तावावर टीकेची झोड उठवली.

ते पत्रकारांना म्हणाले, सावरकारांवर गांधी हत्येचा खटला चालवला गेला होता. त्यांना न्यायलयाने सोडले, मात्र त्यांना निर्दोष जाहीर केले नाही, असा दावा त्यांनी केला. सावरकरांना भारत रत्न देण्याचा प्रस्ताव पुढे येत असताना महात्मा गांधी यांची हत्या का झाली, त्या मागचा कट आणि हेतू आपण समजावून घेणे महत्वाचे आहे.

सावरकरांचा सहभाग निर्विवाद सिध्द करण्याएवढा पुरावा सादर करण्यात आला नाही, असे न्यायलयाने सावरकरांना या खटल्यातून वगळताना म्हटले होते. सावरकरांना देशातील सर्वोच्च पुरस्कार देण्याचा संघी प्रयत्न सुरू असताना आपण ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे.

सावरकरांना या खटल्यातून वगळताना न्यायलयाने त्यांना निर्दोष म्हटलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.                                                                                                                                                     


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: