मुंबई : मी तळागाळात फिरतो. सामान्यांच्यात मिसळतो. त्यामुळे समाजाची नस मला माहित असते. त्यामुळे एक्सिट पोलचे निकाल ऐकून कणभरही अस्वस्थता आली नाही. फक्त माध्यमांनी वस्तुस्थिती मांडली नाही याचे वैश्याम्या वाटते, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रत्यक्षात राजकीय स्थिती काय आहे हे मला माहित होते. त्यामुळे एक्सिट पोलचे अंदाज आणि येणारे निकाल वेगळे असतील, याची मला खात्री मला होती, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. तरुणाईच्या मनातला हा कौल होता. निवडणूक प्रचाराच्या आधीपासून मी महाराष्ट्रात फिरतो आहे. वास्तव चित्र दाखवण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांनीही पाळली नाही, असे ते म्हणाले.

जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्ताधारी पक्षांमध्ये गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सातारा आणि परळी हे निकाल धक्कादायक होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. मात्र हे निकाल पाहून मला काहीही आश्चर्य वाटलं नाही. भाजपाने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली असली तरीही शिवसेनेच्या जागा कमी कशा होतील हे भाजपाने पाहिलं. तसंच त्यांच्या संपर्कात १५ अपक्ष असतील तर काही आश्चर्य वाटत नाही असेही ते म्हणाले.

तरुणाईला बदल हवा होता. निवडणुकीच्या काळात प्रचार करण्यापूर्वी मी महाराष्ट्रात फिरत होतो. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे जनता चिंतित आहे हे मला समजले होते. या निवडणुकीत एका बाजूने एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी प्रचार करत होतो. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या बरोबरीने मेहनत करत होते. हे यश त्यांना आमच्यामुळेच मिळालं आहे असं मी म्हणणार नाही असे पवार यांनीं  स्पष्ट केले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: