विधानसभेच्या प्रचार सभांमध्ये ‘मी पुन्हा येईल’ असं ठामपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा सूर बदलला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परीस्थितीत सरकारला काम करताना अडचण होत असल्याने लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस अकोला दौऱ्यावर गेले आहेत. फडणवीस म्हणाले, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना दुष्काळात देण्यात येणारी सर्व मदत आताही देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना आता कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागणार नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांचे पंचनामे ग्राह्य धरणार आहे. पंचनामे होऊ शकले नाही म्हणून मदत मिळणार नाही असे होणार नाही. सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारचं. या विषयी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ आहे, पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

शेतकऱ्यांना चांगली मदत हवी असेल तर ६ तारखेपर्यंत १०० टक्के पंचनामे करण्याचे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले. लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज पडली तर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: