मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान त्यांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा मेसेज आला आहे. 'नमस्कार संजय राऊत जय महाराष्ट्र' असा मेसेज संजय राऊत यांनी अजित पवार यांना केला. त्यांना काय बोलायचे आहे माहित नाही, नंतर फोन करून विचारेल असं बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना सांगीतले.

तर आता या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तर महायुतीने लवकर सरकार स्थापन करावे. त्याचप्रमाणे पवार साहेब मुख्यमंत्री होणार याची सुतराम शक्यता नसल्याचे देखील ते या बैठकीत म्हणाले आहेत.

तर, झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आपल्याकडे १७५ आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगीतले होते. त्यावर शिवसेनेकडे १७५ चा आला कुठून हे त्यांनाच माहित असे अजित पवार म्हणाले. 

                                                                                                                                                         


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: