मुंबई: आपल्या मुख्यमंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. आज (८ नोव्हेंबर) रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना तांत्रिकदृष्टया आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते.

सध्या राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. १४ दिवस विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन उलटले असतानाही नव सरकार राज्यात स्थापन झालेले नाही. शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. १०५ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे तर ५६ जागा शिवसेनेने जिंकल्या असल्यामुळे शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या या गेल्या आहेत.

फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम असून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी करत आहे. तर मुख्यमंत्रिपदावर भारतीय जनता पक्षाचे नेते अडून बसले आहेत. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वातच राज्यात नवे सरकार स्थापन होणार असा दावाही भाजप नेते करत होते. पण शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने सत्ता संघर्ष अजूनही सुरुच आहे.                                                                        


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: