मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे राज्यपाज भगतसिंह कोश्यारी यांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरिपासाठी शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर 8 हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टर 18 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेचे गुर्‍हाळ सुरू असतांना, अवकाळी पावसांमुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अशावेळी शेतकर्‍यांना तात्काळ मदतीची अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेचा काही केल्या सुटत नव्हता. अखेर राज्यपालांनी शनिवारी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचे मत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. परतीच्या पावसाने मोठा फटका बसलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना राज्यपालांनी दिलासा दिला आहे.

दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर निवडणुका आणि राज्यातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे बळीराजा आणखी संकटात सापडला होता.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेत्यांनी बांधावर जाऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना त्वरीत मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमदार बच्चू कडू यांच्या संघटनांनी आंदोलने केली.

अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर केली. यासाठी 2 हेक्टरची अट ठेवण्यात आली आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी ही मदत अल्प असल्याचे सांगत आपली नाराजी दर्शवली. मदतीचे लवकरच वाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: