पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (18 नोव्हेंबर) दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील महासेनाआघाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नुकतंच शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत जयंत पाटील, सुप्रिया सुळे,  अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे महासेनाआघाडीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.                                                                                                                                                                                         


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: