मुंबई : विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

‘मी आज तुमच्याशी आमदाराच्या नात्याने बोलतोय. ही संधी मला महाराष्ट्राने दिली’, असं म्हणतं त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. नवा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे, असे देखील आदित्य म्हणाले.

 

विधानसभेच्या सभागृहात तरुण चेहरे दिसले. योगेश कदम, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी, रोहित पवार अशा तरुण  आमदारांसोबत काम करताना मजा येईल, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

 

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मित्रपक्षांचेदेखील आभार मानले. ‘मंत्रिमंडळाबाबत ज्येष्ठ नेते ठरवतील. आम्हाला जी जबाबदारी देण्यात येईल, ती आम्ही पार पाडू. तसेच विधानसभेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तसेच ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे देखील ते पहिलेच ठाकरे आहेत.                                                                                                                                                                              

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: