विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शनिवारीच नाव जाहीर करण्यात आले. साकोलीचे आमदार नाना पटोले यांना महाराष्ट्र विकास आघाडीकडून विधानसभा अध्यपदासाठी रिंगणात उतरवण्यात आले. यावेळी भाजप मुरबाडचे किसन कथोरे यांना उमेदवारी होती. मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीच्या नाना पटोलेंची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे.

 

राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार बहुमत सिद्ध करण्याच्या अग्निपरिक्षेत पास झाले. आज त्यांची ठाकरे सरकारची दुसरी परिक्षा होणार होती. मात्र आता भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान हंगामी अध्यक्षांकडून फडणवीस यांना चहापाण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

 

अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात यावे आणि आणि उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे अशी मागणी काँग्रेसकडून लावून धरण्यात आली होती. मात्र पण तिन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेला, अध्यक्षपद काँग्रेसला व उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच द्यावे असे ठरवण्यात आले आहे. यामध्ये कोणताही बदल नको यासाठी हे हा सर्व वाद संपवण्यात आला होता.                                                                                                                                         

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: