मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. पंकजा मुंडे या लवकरच राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. याचे संकेत त्यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करत दिले होते.

 

मात्र त्यांनी अजून एक संकेत दिला आहे. यावरुन त्या लवकरच भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चांणा उधाण आले आहे. अशातच आता पंकजा मुंडे या भाजपशिवाय विचार करत असल्याच्या बातम्या सुरु आहेत, पण त्यामध्ये अजिबात तथ्य नाही, अपघाताने आलेल्या सरकारमध्ये मनाचे मांडे खाणे सुरु आहे. या अफवांवर पडदा पडावा म्हणून प्रदेशाध्यक्ष या नात्याने हे मी स्पष्ट करत आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या कथित पक्षबदलाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, या सर्व निराधार वावड्या आहेत, आमची त्यांच्याशी चर्चा झालीय आहे. असं मत भाजप प्रदेशांध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले.

 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जन्मदिवस 12 तारखेला असतो, मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो, यंदा आम्ही सर्वभाजप नेते त्या कार्यक्रमात सामील होणार आहोत, पंकजा मुंडे भाजपमध्ये होत्या, आहेत आणि असतील अशीही  माहिती त्यांनी यावेळी दिली. पंकजा मुंडेंशी मी स्वत: फोनवरुन बोललो, त्यांची फेसबुक पोस्ट हे केवळ गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मुंडे-महाजन कुटुंबाचं ठाकरे कुटुंबाशी सलोख्याचं नातं, पण त्याचा अर्थ त्या भाजपशिवाय दुसरा विचार करतील असा नाही. असही मत त्यांनी मांडले

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: