मुंबई – दरवर्षी ६ डिसेंबर रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरात दारू बंदी करणारा ड्राय डे घोषित करावा, अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे मुंबई अध्यक्ष जनार्दन कोंडविलकर आणि मुंबई सचिव संदेश कांबळे यांनी सादर केले.

 

६ डिसेंबर ड्राय डे घोषित करावा, अशी मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी जनतेची मागणी आहे. वांद्रे येथील संविधान निवासस्थानी रामदास आठवले यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ६ डिसेंबरला संपूर्ण देशात ड्राय डे घोषित करावा. त्याच बरोबर महाराष्ट्रात सुद्धा ड्राय डे घोषित करण्याचा तात्काळ निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करावी, अशी मागणी जनार्दन कोंडविलकर यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली.

 

यावेळी झालेल्या चर्चेत आपण त्वरित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ड्राय डे घोषित करण्याच्या मागणीचे पत्र पाठवणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे.                                                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: