आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश आर. भानूमती यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यांच्या खंडपीठाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.

 

जामीन देताना न्यायालयाने म्हटले आहे की, परवानगी शिवाय चिदंबरम परदेशात जावू शकत नाहीत. याशिवाय पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांना प्रभावित न करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने चिदंबरम यांना दिले आहेत. तसेच ते माध्यमांना मुलाखत आणि या केस संबंधीत कोणतेही स्टेटमेंट देणार नाहीत.

 

तब्बल 106 दिवस तुरूंगात राहिल्यानंतर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळाल्यानंतर चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमने देखील ट्विट करत आनंद व्यक्त केला. चिंदबरम यांना 5 सप्टेंबरला त्यांच्या घरातून ईडीकडून अटक करण्यात आली होती.                                                                                                                                                                                 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: