औरंगाबाद : “भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये,” असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं  आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जानकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य  केलं.

 

महादेव जानकर यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “एक लक्षात ठेवा, पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार हे विसरता कामा नये. आता काही लोकांना असे वाटत असेल तर ठिक आहे.”

 

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. याबाबत जानकर म्हणाले, “येत्या 12 डिसेंबरला माजी दिवंगत मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस असतो. त्या दिवशी आम्ही सर्वच गोपीनाथ गडावर जातो.”

 

“पण काहीही होणार नाही. ताईंनी फेसबुक पोस्टमध्ये मावळे म्हटलं आहे. पण आता मावळे काय आपण प्रत्येकाला लिहितो. त्या भाजपच राहणार असून त्या कधीही पक्षाच्या बाहेर पडणार नाही,” असा विश्वासही महादेव जानकर यांनी व्यक्त  केली. दरम्यान पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.       

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: