हैद्राबादमध्ये एका डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घुण हत्येच्या गुन्ह्यातील अरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर करून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांची बाजू लक्षात घेतली पाहिजे. अश्या प्रकरणात स्वसंरक्षणासाठी पोलिसांना प्रतिउत्तरादाखल फायरिंंग करावी लागते. मात्र या एन्काऊंटर वर संशय घेतला जात असेल तर या प्रकरणी चौकशी करण्यास काही हरकत नाही. या एन्काऊंटर प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असल्याचे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत व्यक्त केले.

हैद्राबादमध्ये एका डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घुण हत्येच्या गुन्ह्यातील अरोपींना पोलिसांनी एन्काऊंटर करून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांची बाजू लक्षात घेतली पाहिजे. अश्या प्रकरणात स्वसंरक्षणासाठी पोलिसांना प्रतिउत्तरादाखल फायरिंंग करावी लागते.  तसेच बलात्कार करून स्त्री ची हत्या करण्याच्या अमानुष गुन्ह्यात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याचा कायदा झाला आहे. समाजात असे गुन्हे घडू नयेत यासाठी अश्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली पाहिजे. अशा गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल चौकशी करतेवेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा तेलंगना पोलिसांनी जागीच एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं.

तसेच बलात्कार करून स्त्री ची हत्या करण्याच्या अमानुष गुन्ह्यात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याचा कायदा झाला आहे. समाजात असे गुन्हे घडू नयेत यासाठी अश्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा केली पाहिजे. अशा गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल चौकशी करतेवेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा तेलंगना पोलिसांनी जागीच एन्काऊंटर केला. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: