मुंबई: लवकरच मोठा निर्णय भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे घेण्याची शक्यता आहे. त्यांनी कालच दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांची ते भेट घेणार आहेत. ते काहीवेळापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे.

 

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे बदलल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले होते. गेल्या काही दिवसांमध्ये आपली नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे नजीकच्या काळात हे दोन्ही नेते भाजपला धक्का देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मंगळवारी खडसे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तशी ऑफरही देऊ केली. काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे आल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

 

या दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावरही चर्चा झाली होती. एकनाथ खडसे यांनी या बैठकीनंतर बाहेर येऊन भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर आगपाखड केली होती. नेतृत्वाने अपयशाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील पक्षावर नाराज आहेत. त्या गोपीनाथ गडावर मेळावा घेणार आहेत. त्यावेळी पंकजा मुंडे काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: