सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या प्रकाश आंबेडकरांवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

 

अनुसूचित जातींवर अन्याय होत असताना वंचित आणि एमआयएम कुठे गेले. त्यांनी CAA, NRC विरोधात एकतरी आंदोलन केलं का? कुठे गेलं रक्त आणि कुठे गेले वंचित? असा प्रश्न प्रणिती शिंदेंनी विचारला आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध वंचित, एमआयएम असा संघर्ष सुरु झाला   आहे.

 

सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप हटाव आरक्षण बचाव या धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यावरही निशाणा साधला. प्रणिती शिंदेनी वंचित आणि एमआयएम हे भाजपचे दलाल असल्याचं टीका केली आहे.

 

“हम सब एक है और आखरी दम तक एक रहेंगे,” असा नाराही प्रणिती शिदेंनी यावेळी दिला.

 

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे ,भाजपचे डॉ जयसिदेश्वर शिवाचार्य आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. प्रकाश आंबेडकरांना मत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताला मत असा प्रचार करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या मतांचा मोठा फटका शिंदेना बसल्यामुळे शिंदेना पराभव झाला होता. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी पहिल्यादांच जोरदार टीका केली आहे.

 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेनंतर आता राजकारण चांगलंच पेटू लागलं आहे. गेल्या दोन महिन्यापासून वंचितचे प्रकाश आंबेडकर हे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र प्रणिती शिंदेंसारख्या भाजप धार्जिणे आमदारामुळेच भाजपची सत्ता येत असल्याची टीका वंचित कडून करण्यात येत आहे.

 

प्रणिती शिंदेना निवडणूक काळात आरएसएस आणि शिवसेनेने केलेली मदत कुठली कुठली दलाली केली हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर आमदार प्रणिती शिंदेचा पक्षच दलाल असल्याचं सांगत सत्तेसाठी शिवसेनेबरोबर गेल्याची टीका केली (Praniti shinde criticises Modi government) आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: