नीरा देवधरच्या पाण्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण पेटताना दिसत आहे, गेली बारा वर्षे नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले पाणी पुन्हा एकदा दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये आता खा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे.

     रामराजे निंबाळकर यांनी छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका त्यांना शोभते का ? आपल वय वाढल्यामुळे लोकांवर टीका करताना ते पिसाळलेली कुत्री म्हणतात, त्यांना पाण्याचे खाते सांभाळूनही पाणीच कळले नाही, रांमराजे हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. सरकारने दुष्काळी जनतेला पाणी माघारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये त्रुटी काढण्याच काम ते करत आहेत, अशा लोकांना जोडे मारत मतदारसंघातून हाकलून दिल पाहिजे, अशी घणाघाती टीका खा रणजितसिंह यांनी केली आहे.

साताऱ्यात पिसाळलेली तीन ‘कुत्री’, भडकलेल्या रामराजेंकडून उदयनराजेंची तुलना ‘कुत्र्याशी’

     नीरा देवधरच्या पाण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे यांनी रामराजे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता, तर आता उदयनराजे यांना उत्तर देताना रामराजेंची जीभ घसरली आहे. साताऱ्यात पिसाळलेली तीन कुत्री आहेत, ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेलेचं राजकारण करू, अशी टीका करत रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली होती. तसेच शरद पवारांनी उदयनराजेंना आवराव, अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे.

लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी – उदयनराजे

दुष्काळी भागाला पाणी देण्याचा अध्यादेश चौदा वर्षात का काढला नाही, असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, कृष्णा खोऱ्याचे मंत्री तसेच स्वतःला भगीरथ समजणाऱ्याने फक्त लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी केल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला. जेव्हा आपण लाल बत्तीच्या गाडीतून फिरतो, पुढे मागे संपूर्ण खात्याचा उपभोग घेतो, संबंधित खात्याचे मंत्री म्हणून काम केले असते तर आज खंडाळा, फलटण, सांगोला आणि पंढरपुरच्या लोकांनी आशीर्वाद दिले असते, असही उदयनराजे म्हणाले.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: