भारत आणि बांगला देश यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज संध्याकाळी नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडीयम वर खेळला जाणार आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

अष्टपैलू खेळाडू असलेल्या शिवम दुबेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या टीमने 5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, 2019 च्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 4 सामन्यात संधी देण्यात आली. त्यानंतर त्याला संघातून बाहेरं बसवलं होतं. त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.

मात्र, विजय हजारे ट्रॉफी आणि इंडिया ए कडून खेळताना त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे.रविवारी होणाऱ्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्माने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतसोबतच टी-२० सीरिजसाठी विकेट कीपर संजू सॅमसनचीही निवड करण्यात आली आहे. मग संधी कोणाला मिळणार? असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. तेव्हा पंत अनुभवी आहे आणि त्याला संधी द्यायची गरज आहे. आमचे दोन्ही विकेट कीपरकडे प्रतिभा आहे. पण पंतने टी-२०मध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने फक्त १०-१५ मॅच खेळल्या आहेत, त्यामुळे त्याला आणखी संधी मिळाली पाहिजे. एवढ्या लवकर त्याच्याबद्दल मत बनवणं चुकीचं ठरेल, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: