नेपाळ येथे सुरू असलेल्या “दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धत” महिलांच्या कबड्डीत भारतासह यजमान नेपाळने विजयी सलामी दिली. पुरुषांत मात्र एकवेळच्या विजेत्या पाकिस्तानला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला. महिलांत चार, तर पुरुषांत पाच संघ असलेल्या या विभागात दोन्ही गटांत भारतीय संघालाच विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

 

महिलांत भारताने श्रीलंकेचे आव्हान ५३-१४ असे सहज परतवून लावले. सुरुवातपासून आक्रमक खेळ करीत भारताने मध्यांतराला भारताकडे २५-०६ अशी मोठी आघाडी होती. उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ भारताने ३९ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. निशा, पुष्पा, यांच्या धुव्वादार चढायांना मिळालेली पायल चौधरी व रितू नेगीची अष्टपैलू साथ त्यामुळे हे शक्य झाले.

 

महिलांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान नेपाळने बांगला देशाचा ३६ – २५ असा पराभव करीत आगेकूच केली.पुरुषांत श्रीलंकेने पाकिस्तान या बलाढ्य संघाला २९-२७ असे चकवित या स्पर्धेत खळबळ उडवून दिली. मध्यांतराला १९-०९अशी आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेला मध्यांतरानंतर मात्र पाकिस्तानने कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: