भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची ‘वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलिट ऑफ द इअर’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार मिळवणारी राणी जगातील पहिली हॉकीपटू ठरली आहे. द वर्ल्ड गेम्सने जगभरातील क्रिडा चाहत्यांकडून करण्यात आलेल्या मतदानानंतर राणीच्या नावाची घोषणा केली. 20 दिवस पार पडलेल्या या प्रक्रियेत क्रिडा चाहत्यांनी केलेल्या एकूण 7,05,610 मतांपैकी राणी रामपालला सर्वाधिक 1,99,477 मते मिळाली.

 

मागील वर्षी भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच सीरिजवर नाव कोरले होते. या स्पर्धेत राणीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

 

काही दिवसांपुर्वीच पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या राणीने याविषयी सांगितले की, मी हा पुरस्कार संपुर्ण हॉकी समूह, माझा संघ आणि माझ्या देशाला समर्पित करते. हे यश हॉकीचे चाहते, माझा संघ, प्रशिक्षक, हॉकी इंडिया, सरकार, बॉलिवुडमधील माझे मित्र, सर्व खेळाडू आणि देशवासियांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाला. त्यांनी मला मत दिले. तिने वर्ल्ड गेम्स फेडरेशनचे देखील आभार मानले.

 

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: