नोकियाने आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 6.2 भारतात लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात तीन रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. अॅमेझॉनवर या फोनची विक्री सुरू झाली असून, हा फोन 15,999 रूपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

ड्युल सिम नोकिया 6.2 आउट ऑफ बॉक्स अँड्रॉयड पायवर चालेल. यामध्ये 6.3 इंचचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. जो एचडीआर10 सपोर्टसोबत येतो. स्क्रीनवर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रँगन 636 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या फोनमध्ये मिळेल. फोनमध्ये बॅटरी 3,500 एमएएचची आहे.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर या फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी फीचरमध्ये वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस आणि 4 जी एलटीईचा समावेश आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: