अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपल लवकरच जागतिक बाजारपेठेत आपला सर्वात स्वस्त आयफोन एसई2 लाँच करणार आहे. कंपनीच्या या फोनच्या डिटेल्स लीक झाल्या आहेत. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, आयफोन एसई2 चे प्रोडक्शन या वर्षी सुरू होईल. मात्र कंपनीने या फोनच्या लाँचिंगबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही.

या फोनचे प्रोडक्शन फेब्रुवारी 2020 पासून सुरू होईल व मार्चमध्ये हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या या सर्वात स्वस्त आयफोनची किंमत 399 डॉलर (जवळपास 28 हजार रुपये) असण्याची शक्यता आहे. कंपनी या आयफोनचे केवळ 20 ते 40 युनिट्सचीच विक्री करणार आहे.

कंपनी आयफोन एसई2 ला जुन्या आयफोन 8 प्रमाणे डिझाईन करू शकते. याशिवाय कंपनी या आयफोनमध्ये टच आयडी बटन देखील देईल. जे फेस आयडी आल्यानंतर काढून टाकण्यात आले होते. या फोनमध्ये लेटेस्ट ए13 प्रोसेसर मिळेल.

आयफोन एसई2 मध्ये 3 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, फोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा आणि एलसीडी डिस्प्ले मिळेल.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: